जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गिरणा पंपिंग रोड येथील रामनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी दि. १८ मार्च रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश दिलीप येवले (वय-२६, रा. गिरणा पंपिंग रोड, रामनगर, जळगाव) या तरुणाचे दि. १५ मार्च ते १७ मार्च दरम्यान घर बंद होते. त्यावेळी चोरटयांनी घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे अंगठ्या असा एकुण ६० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी दि. १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आले आहे. या संदर्भात मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहे.