जळगाव, (प्रतिनिधी) : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमणी पाखरांच्या घटत्या संख्येस कारणीभूत ठरत आहे. चिमण्या अंगणातून गायब झाल्या आहेत. चिमण्या पुन्हा परत याव्या यासाठी जागतिक चिमणी दिनाच्या निमित्त चिमणी पाखरांसाठी ‘एक घास चिऊचा’ संकल्पना श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आली.
दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी विविध प्रकारचे घरटे तयार करून आणले होते यात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा समावेश होता. चिमण्यांचा अंगणातील किलबिलाट वाढावा, त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू व्हावे, यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मध्ये चिमणी – पक्षांबद्दल प्रेम वाढावे यासाठी पक्ष्यांसाठी घरटी तयार करून प्रयत्न केले जात आहे.
मुख्याध्यापक मुकेश नाईक सांगतात की, एक घास चिऊताईचा म्हणून आई आपल्या बाळाला एक घास मायेने भरवते. मात्र, चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली आहे. कुठेतरी बालपणाच्या आठवणीची चिऊताई जोडली गेलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ आदींचे घरीच जलपात्र तयार करून घराच्या छतावर तर कुणी खिडकीला किंवा झाडाच्या फांदीला लटकवा व त्यामध्ये पाणी व थोडेसे अन्न टाका असं सांगितले.