रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील भामलवाडी येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वा. घडली. याबाबत निंभोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील शेतकरी युवराज वसंत पाटील यांचे कुटुंब शेती कामासाठी घराबाहेर पडल्यावर युवराज पाटील हे एकटेच घरी होते. त्यांचा मुलगा घरी आल्यावर, वडिलांनी घराच्या छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
घटनास्थळी निंभोरा पोलिसांनी पंचनामा करून, रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत युवराज वसंत पाटील यांच्यावर स्टेट बँकेचे कर्ज होते. तसेच मुलीच्या लग्नाची चिंता असल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याबाबत पुढील तपास निंभोरा पोलीस करत आहे.