• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यकारिणीचे गठन

जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रल्हाद बोऱ्हाडे, प्रधान सचिवपदी सुनील वाघमोडे, रविंद्र चौधरी, दीपक मराठे यांची निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यकारिणीचे गठन

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पुढील २ वर्षांसाठी निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यात जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रल्हाद रामधन बोऱ्हाडे यांची तर जिल्हा प्रधान सचिवपदी सुनील हिरालाल वाघमोडे, रविंद्र युवराज चौधरी, दीपक मोतीराम मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच नूतन मराठा महाविद्यालयात घेण्यात आली. निरीक्षक म्हणून राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक) उपस्थित होते. तर मार्गदर्शक राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, प्रा. डी. एस. कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे, उपाध्यक्ष नाना लामखेडे उपस्थित होते. मावळत्या कार्यकारिणीच्या कार्याचा गौरव करून निरिक्षक डॉ. गोराणे यांनी एकमताने निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीला सदिच्छा दिल्या.

यानंतर नूतन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारिणीची मुदत दि. १ एप्रिल २०२५ ते दि. ३१ मार्च २०२७ अशी राहणार आहे. जिल्हा अध्यक्षपदी पुनश्च एकदा नेमिवंत धांडे (जळगाव) यांची निवड झाली. तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नाना नारायण लामखेडे (जामनेर),राजेंद्र बावस्कर (भुसावळ) यांची फेरनिवड झाली. तर अमळनेर येथील अशोक लोटन पवार यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली. इतर कार्यकारिणीत बुवाबाजी विभाग कार्यवाह : भीमराव चिंधू दाभाडे, महिला सहभाग कार्यवाह : शोभा प्रल्हाद बोऱ्हाडे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह : जितेंद्र धनगर, युवा सहभाग विभाग : ॲड. सागर बहिरुणे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह : भाऊसाहेब साळुंके, सांस्कृतिक विभाग : प्रताप पाटील, मानसशास्त्र विभाग कार्यवाह : मिनाक्षी विश्वजीत चौधरी, कायदा व्यवस्थापन विभाग : ॲड. भरत मुरलीधर गुजर यांची निवड एकमताने झाली.

Next Post
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group