• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा ; मोबाईल, रोकड असलेली पिशवी केली परत

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा ; मोबाईल, रोकड असलेली पिशवी केली परत

अमळनेर, (प्रतिनिधी) : एका विद्यार्थ्याला शेतात जाताना दोन मोबाइलसह पैसे व कपडे असलेली पिशवी सापडली. सदरची थैली हि पोलीस पाटील शीतल पाटील यांची असल्याचे दिसून आले. मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे वस्तू मालकाला परत केले आहे. मोबाइलमध्ये अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असल्याने मालकाने विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत विशाल पाटील हा ७ रोजी भावासह शिरूड रस्त्यावर शेतात जात असताना त्याला रस्त्यात कपडे असलेली पिशवी मिळाली. त्यात पैसे असलेली पर्स आणि दोन मोबाइल होते. वेदांतने सर्व वस्तू वडील विशाल पाटील यांना विचारून घरी आणल्या. दोघांनी वर्गशिक्षक संजय पाटील यांना घटना सांगितली.

दरम्यान मोबाइलवर आलेल्या कॉलवरून मूळ मालकाचा शोध लागला. त्या वस्तू पारोळा तालुक्यातील इंधवे येथील पोलिस पाटील शीतल ज्ञानेश्वर पाटील यांच्या असल्याची माहिती मिळाली. त्या मोबाइलमध्ये त्यांच्या पतीची आर्मीची महत्त्वाची कागदपत्रे तसेच मुलीच्या नीट परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम असल्याने ते कुटुंब व्यथित झाले होते.

शीतल पाटील यांना भागवत पाटील यांनी वस्तू घेण्यासाठी मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील शाळेत बोलावले. सर्वांसमक्ष वस्तू परत करण्यात आल्या. मोबाइलमधील कागदपत्रे आणि सर्व अभ्यासक्रम जसाच्या तसा परत मिळाल्याने शीतल पाटील यांनी वेदांतचा सत्कार करून त्याला बक्षीस दिले.

Next Post
आ. किशोर पाटील यांच्या पाठपुरावाने २१ कोटींचा निधीला मंजुरी

आ. किशोर पाटील यांच्या पाठपुरावाने २१ कोटींचा निधीला मंजुरी

ताज्या बातम्या

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add