जळगाव, (प्रतिनिधी) : जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या निमित्ताने भारतात देखील विविध क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. देशातील शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात परत आणण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात एक विशेष योजना सुरू केली आहे.
‘मोफत कन्या शिक्षा प्रवेश उत्सव’ योजना या नावाने ही योजना सुरू केली आहे. सदर योजना दि.८ मार्च ते १५ मार्च २०२५ दरम्यान प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी लागू राहील. मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी कन्या शिक्षण योजना योजना लागू केली आहे.
सदर योजनेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांची जेष्ठ कन्या चैताली प्रतीक वंजारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.