• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांचा सन्मान

आरोग्य विभागाकडून आशा दिन उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
महिला दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांचा सन्मान

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : येथील पंचायत समिती येथे महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग जामनेरच्या वतीने आशा दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने व स्त्रीशक्ती पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नानासाहेब आगळे, प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका संध्या पाटील, आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ.अमोल शेठ हे होते. आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा सत्कार सन्मान करणे तसेच त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आशा दिनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रास्ताविकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले तर डॉ.मोहित जोहरे यांनी आभार मानले.

ग्रामीण भागात आरोग्याचे दैनंदिन कामकाज करताना गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका प्रचंड मेहनत घेतात. प्रत्येक गावातील भागात आशा स्वयंसेविका या काम करीत असल्याने आरोग्य विभाग हा कामकाजाचे उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकतो.कोव्हिड काळात आशा स्वयंसेविका यांनी उत्कृष्ट कामकाज केले,आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य यंत्रणेचा कणा असल्याचे मत तहसीलदार नानासाहेब आगळे व मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी आशा स्वयंसेविकांनी रांगोळी, गीत गायन, चित्रकला, निबंध स्पर्धेत हिरारीने सहभाग घेऊन “बेटी बचाओ बेटी पढाव” चा संदेश दिला.

याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. मोहित जोहरे, डॉ.चारुशीला ठाकूर, डॉ.नरेश पाटील, डॉ. नंदलाल पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ.पराग पाटील, डॉ.सागर पंडित, डॉ.आशिष महाजन, अमरीश चौधरी, गणेश राऊत, तालुका समूह संघटक प्रदीप पाटील, बशीर पिंजारी, प्रवीण दाभाडे, राजु तडवी, गोपाळ पाटील, किशोर पाटील, भागवत वानखेडे, पुंडलिक पवार, विक्रम राजपूत, हेमंत पाटील, स्वप्नील महाजन सर्व गटप्रर्तक व मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

 


 

Next Post
झोळीत झोपलेल्या बाळावर कुत्र्यांचा हल्ला ; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू !

झोळीत झोपलेल्या बाळावर कुत्र्यांचा हल्ला ; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू !

ताज्या बातम्या

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन
जळगाव जिल्हा

महादेव, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्र, साहित्य पूजन

October 22, 2026
भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर
जळगाव जिल्हा

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

October 22, 2026
जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add