• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खून करून अपघाताचा बनाव ; विम्याचे ९८ लाख परस्पर लाटले !

तीन जणांवर गुन्हा दाखल ; मयत जळगावच्या पिंप्राळ्यातील रहिवासी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 8, 2025
in गुन्हे
0
खून करून अपघाताचा बनाव ; विम्याचे ९८ लाख परस्पर लाटले !

जळगाव, (प्रतिनिधी) : कोमात असलेल्या जळगावच्या तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणी फाट्याजवळ खून करून दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवून संशयित आरोपींची यानंतर विम्याचे ८३ लाख आणि दुचाकीच्या विम्यावरून १५ लाख असे ९८ लाख रुपये लाटल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव येथील दोघे व एरंडोल येथील एक अशा ३ जणांना अटक करण्यात आली. मृताच्या चुलत बहिणीने नाशिक आयजींकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तिघांवर खुनाच्या गुन्ह्याचे कलमदेखील वाढवण्यात आले.

शरद किसन जगताप (वय ३८, रा. संत मीराबाई नगर, पिंप्राळा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत शरदच्या चुलतबहिणीने याप्रकरणी नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी या प्रकरणात चौकशी केली. शरद किसन जगताप हे आजारी पडून कोमामध्ये गेले. यावेळी संशयित आरोपी राजू सुभाष गुजारे (वय ४५, रा. न्यू लक्ष्मीनगर, मेहरुण) याने शरद जगताप यांच्या नातेवाइकांना विमा क्लेम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी शरद यांचा दि.२८ मे २०२३ रोजी भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणीजवळील साईबाबा मंदिरालगत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघात झाल्याचे दाखवले.

जळगावचा योगेश वाणी या रुग्णवाहिका चालकाने पोलिसांना मुक्ताईनगरकडून भुसावळकडे येताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसले. त्यात जखमी तरुणाला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्याचा जबाब दिला. पण, तो खोटे बोलत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने आपण मुक्ताईनगरहून रुग्णवाहिका घेऊन येत असल्याची बतावणी केली. या अपघातप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खोटी फिर्याद देणारा घनःशाम अमृत सपकाळे (वय २७, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल), जळगाव येथील रुग्णवाहिका चालक योगेश प्रकाश वाणी (वय ३०, रा.गणेशवाडी, जळगाव) यांनी मदत केली.

यानंतर जगताप यांचा १ कोटी रुपयांचा इन्शुरन्स क्लेम करून ८३ लाख व दुचाकी विम्याचे १५ लाख मिळवले. ही रक्कम मृताच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा झाली. पण हे बँक खाते आणि त्याला लिंक असलेला मोबाइल क्रमांक पण राजू गुजारे हा हाताळत होता, असे तपासात समोर आले. याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी ४ मार्चला राजू सुभाष गुजारे, तर ५ मार्चला घनश्याम अमृत सपकाळे व योगेश प्रकाश वाणी यांना अटक केली. तिघांना भुसावळ न्यायालय हजर केल्यावर पाच दिवसांची दि. ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यासंदर्भात अधिक तपास वरणगावचे एपीआय जनार्दन खंडेराव, हवालदार एस.जे.सावकारे, मनोहर बनसोडे करत आहेत.


 

Next Post
बालरंगभूमी परिषदेच्या मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

बालरंगभूमी परिषदेच्या मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

ताज्या बातम्या

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली
जळगाव जिल्हा

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group