• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मधमाश्यांचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर हल्ला, ८ जण जखमी

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
मधमाश्यांचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर हल्ला, ८ जण जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिरसोली रोडवरील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अचानक मधमाशांचे पोळे उठले अन् त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एक विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यासह प्रशिक्षणाला आलेले ५ उर्दू विद्यालयातील शिक्षकदेखील जखमी झालेले आहेत. एकूण ८ जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची गर्दी होती. तर दुसरीकडे शिक्षक अभिवृद्धी क्षमता प्रशिक्षणासाठी आलेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक मधमाशांचे पोळे उठले. त्यातील यशश्री राजेंद्र गांगुर्डे (वय १९, शिव कॉलनी, जळगाव) या विद्यार्थिनीच्या मागे मधमाशा लागल्या. यशश्री पळत गेटच्या दिशेने धावली. तेथे प्रशिक्षण आटोपून गेटजवळ आलेले शिक्षक असोदा येथील मुख्याध्यापक सय्यद अखलाक मुश्ताक (वय ५४), शेख काकर (वय ४५, नशिराबाद उर्दू हायस्कुल), केंद्रप्रमुख मसूद अहमद शेख मन्सूर (वय ३८,नशिराबाद शाळा क्र. १), असीम खान मंजूर खान (वय ४०, नशिराबाद उर्दू शाळा) यांच्यामागेही मधमाश्या लागल्या.

घटनेत सिद्धेश्वर हेमराज तायडे (वय २३), इकबाल खान रमजान खान (वय ५१), सुरक्षारक्षक युवराज विश्वनाथ सोनार (वय ५७) हे देखील जखमी झाले आहेत. घटनेत चारही शिक्षक जबर जखमी झाले. यात केंद्रप्रमुख मसूद अहमद यांना अधिक चावे घेतल्याने गंभीर झाले आहेत. तर घटनेप्रकरणी आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तेथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, उन्हाळा सुरु होताच मधमाश्या चावण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी असोदा शिवारात ५ जणांना तर गुरुवारी दि. ६ मार्च रोजी एरंडोल तालुक्यात एका शेतात २ वृद्धांना मधमाश्यांची चावे घेऊन जखमी केल्याची घटना घडली होती.

Next Post
जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group