• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बांधकामावर पाणी मारताना तोल जाऊन एकाचा मृत्यू

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
बांधकामावर पाणी मारताना तोल जाऊन एकाचा मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील चंदूअण्णा नगर परिसरातील गिरणाई कॉलनी भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर पाणी मारत असताना तोल जाऊन एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनोहर ढेमा बारेला (वय ३०, रा.उंबऱ्या, ता.भगवानपुर, जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे मयत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. मनोहर बारेला हे गेल्या दीड वर्षांपासून शहरातील नरेंद्र साळूंखे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. परिसरातील एका ठिकाणी झोपडीत मनोहर बारेला हे पत्नी व मुलं यांच्यासह राहत होते. रविवारी रात्री नियमितप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाणी मारत असताना दुसऱ्या मजल्यावरुन तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तोल गेल्यामुळे खालच्या बाजूला वाळू व इतर बांधकाम साहित्य देखील होते. तर बांधकामाच्या ठिकाणी वॉल कंपाऊंडची भिंत देखील तयार करण्यात आली होती. मनोहर हे दुसऱ्या मजल्यावरुन थेट वॉलकंपाऊंडच्या भिंतीवर आदळले. त्यामुळे त्यांचा डोक्याला जबर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करत आहेत.

Next Post
किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group