• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महावितरणची वीज ग्राहकांकडे सुमारे २५० कोटी रुपयांची थकबाकी

वीजबिल वसुलीसाठी स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेण्याच्या सूचना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
महावितरणची वीज ग्राहकांकडे सुमारे २५० कोटी रुपयांची थकबाकी

जळगाव, (प्रतिनिधी) : महावितरणच्या जळगाव परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कृषी ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यक, औद्योगीक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे सुमारे २५० कोटी रुपयांची थकबाकी थकली आहे. चालू वीज बिलांसह थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले जात असतांना काही ठिकाणी वसुली करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व आरेरावीच्या दुर्देवी घटना घडतांना आढळून येत आहे. वसुलीसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन वीजबिल वसुली करण्यात यावी, अशा सुचना महावितरणकडून क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक आणि इतर वर्गवारितील ग्राहकांकडे महावितरणचे जळगावमध्ये १४१ कोटी, धुळ्यात ७६. ११ कोटी तर नंदुरबार जिल्ह्यात ३१. ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. चालू वीज बिलांच्या रक्कमा वेगळ्या आहेत. त्याच्या वसुलीसाठी महावितरणकडून प्राधान्य देण्यात येत आहे. वीजग्राहकांनीही महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन किंवा गुगल पे, फोन पे, नजिकचे महाईसेवा केंद्र, वॉलेट, महावितरण ॲप व इतर ऑनलाईन माध्यमातून वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

महावितरण ही सरकारी वीजवितरण कंपनी आहे. बहुतांशी ठिकाणी काही ग्राहकांकडून विजेची नियमितपणे बिले भरली जात नसल्याने ग्राहकांकडे थकबाकी वाढली आहे. वसुलीसाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येत आहे. तशा कारवाईसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य व संरक्षण घेण्याच्या सुचना महावितरणचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांनी जळगाव परिमंडलातील क्षेत्रिय अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

वापरलेल्या विजेच्या बिलांच्या वसुलीसाठी कारवाई सुरु असतांना काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाणीच्या घटना घडत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून तशा प्रकरणात पोलीसांत गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही महावितरणच्या वरिष्ठांनी दिलेल्या आहेत. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार मारहाण करणाऱ्यांना दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासासह आर्थिक दंडाची तरतूद आहे.

Next Post
रामद्वारा येथे राम नाम अखंड नामस्मरणाचे आयोजन

रामद्वारा येथे राम नाम अखंड नामस्मरणाचे आयोजन

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group