• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृद्ध पुजाऱ्याचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू ; जळगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
वृद्ध पुजाऱ्याचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू ; जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील गोशाळेजवळ पायी जात असलेल्या एका वृद्ध पुजाऱ्याला अज्ञात भरधाव रिक्षाने मागून जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११. ३० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मनोहर बाबुराव जोशी (वय ८१, रा. साई सिटी कॉलनी, कुसुंबा, जळगाव) असे मयत वृद्ध पुजाऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे यांच्यासह राहत होते. कुसुंबा येथील शंकर पार्वती मंदिरात पुजारी म्हणून ते सेवा करीत होते. दरम्यान, सोमवारी दि. २४ रोजी सकाळी ११. ३० वाजता मनोहर जोशी हे गोशाळेजवळून पायी जात होते. तेव्हा अचानक अज्ञात रिक्षाने त्यांना मागून धडक देऊन पसार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. जखमी मनोहर जोशी यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, महाशिवरात्रीच्या आधीच भगवान महादेवाची सेवा करणाऱ्या पुजारीबाबांचे निधन झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Next Post
सायन्स असोसिएशनतर्फे ‘वर्ल्ड ग्रेट सायंटिस्ट’ पोस्टर प्रदर्शन संपन्न

सायन्स असोसिएशनतर्फे 'वर्ल्ड ग्रेट सायंटिस्ट' पोस्टर प्रदर्शन संपन्न

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group