• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रविणऋषीजी यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांचा लक्षवेधी सहभाग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 25, 2025
in धार्मिक
0
प्रविणऋषीजी यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘अर्हम विज्जा’चे प्रणेते, श्रमण संघीय उपाध्याय प्रवर, ओजस्वी वक्ता श्री प्रविणऋषीजी महाराज साहेब व मधुरगायक, सेवाभावी तीर्थेशऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासा निमित्त गणपतीनगर स्थित स्वाध्याय भवन येथे मंगल प्रवेश झाला. जळगावकरांच्या प्रेमापोटी ‘वर्षी-तप’ सारखी कठीण तपश्चर्या सुरू असताना ७०० किलोमिटरची पदयात्रा विहार करीत श्री. प्रविणऋषीजी म.सा. जळगावात पोहचले. दोन्ही संतांच्या स्वागतासाठी निघालेल्या भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जैन हिल्स येथून सोमवारी सकाळी प्रविणऋषीजी म. सा. व श्री. तीर्थेशऋषीजी म. सा. यांनी पायी विहारास सुरवात केली. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन होते. भाऊंचे उद्यान काव्यरत्नावली चौक येथून समाजबांधवांनी गुरूभगवंतांच्या स्वागतासाठी आकर्षक शोभायात्रेचे आयोजन केले होते.

याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, संघहितैषी प्रदीप रायसोनी, मंत्री अनिल कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२५ चे अध्यक्ष राजकुमार सेठिया, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, दादावाडी विश्वस्त प्रदीप मुथा, जयमल संघाचे स्वरूप लुंकड, पारस राका, साधूमार्गी संघाचे मोतीलाल मुणोत, विनोद मल्हारा, रत्नसंघाचे सुनील बाफना व अमर जैन तसेच पदाधिकारी यांच्यासह जय आनंद ग्रुप, युवाचार्य ग्रुप, श्रमण महिला मंडळ, आदी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

‘अहिंसा परमो धर्म’चा दिला संदेश..
भाऊंच्या उद्यानाजवळील काव्यरत्नावली चौकातून उत्साहात निघालेली शोभायात्रा ही जैन धर्मनाथ मंदीर, अल्पबचत निवास मार्गे स्वाध्याय भवन येथे पोहचली. कलशधारी कन्या, अष्टमंगल, अर्हम विज्जा त्यात ‘आत्मा में परमात्मा की अनुभूती कराने की कला, श्रेष्ठत्व जीवन का निर्माण, मातृत्व एवं पितृत्व को दिव्य अनुभूती के साथ जीना’ असे सामाजिक संदेश दिले होते. आनंद ओवी, जैन ध्वजद्वारे ‘अहिंसा परमो धर्म’ हेच मनुष्य कल्याणाचे साधन असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश-घोषणा शोभायात्रेतून दिल्या गेल्या.

स्वाध्याय भवन प्रांगणात आल्यावर श्रावक-श्राविकांनी अष्टमंगल व अष्टप्रतिहार्य व जैन ध्वज ऊंचावून गुरूमहाराजांचे भावस्पर्शी स्वागत केले. जैन युवा फाऊंडेशन तर्फे स्वागतपर भक्तीनृत्य तर श्रमण संघ महिला मंडळाच्या वतीने स्वागत गीताने गुरुमहाराजांचे मनोभावे स्वागत केले गेले. कस्तुरचंद बाफना यांनी मनोगतातून काव्यमय प्रस्तूती केली.

प्रविणऋषीजी म.सा. यांनी आशीर्वादपर मनोगतात ‘जळगावमध्ये आधी दोन वेळा विहार मार्गात असल्याने आलो. पहिल्यांदाच जळगावकरांच्या विशेष विनंतीवरून ७०० किलोमिटरची पदयात्रा करुन आलो. स्वर्णनगरी म्हणून ओळख असलेले जळगाव, धर्मनगरी म्हणूनही प्रसिद्ध असल्याची प्रचिती ठिक-ठिकाणी लागलेल्या बोर्डवरून आली. जळगावकरांची धर्माप्रती असलेली दृढ आस्था, उत्साह पाहून खूप आनंद झाला. आमचे याठिकाणी येणे सार्थकी झाले.’ जैन दर्शनमध्ये चार प्रकाराचे ध्यान सांगितले आहे. यातील ‘धर्मध्यान’ आपल्या जीवनात कसे आचरण करावे याबाबत सखोल विवेचन पुढील १५ दिवस प्रवचनात केले जाणार आहे. अनिल कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे नवकारशीची व्यवस्था करण्यात आली होती.


Next Post
कारला कंटेनरची जबर धडक ; पत्नीचा मृत्यू, पतीसह ३ मुले गंभीर जखमी

कारला कंटेनरची जबर धडक ; पत्नीचा मृत्यू, पतीसह ३ मुले गंभीर जखमी

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group