किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : पुणे येथे शिक्षण घेत असलेला ओम बोरसे यास नुकतीच कमिन्स इंडिया फाउंडेशनतर्फे नर्चरिंग ब्रिलियन्स स्कॉलरशिप देण्यात आली. ओम हा जामनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती चौधरी यांचा मुलगा आहे.
पुण्याच्या AISSMS पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ओम बोरसे यांनी प्रतिष्ठित नर्चरिंग ब्रिलियन्स स्कॉलरशिप (शैक्षणिक वर्ष २०२४-२५) साठी मिळाली आहे. ही शिष्यवृत्ती कॅमिन्स इंडिया तर्फे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. यात त्याला लॅपटॉप आणि एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे.
दरम्यान जामनेर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान युवक ओम बोरसे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते. ओम बोरसे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा गौरव केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण तेली समाजासाठी प्रेरणादायी ठरला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.