• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुंबईच्या डॉक्टरांची सेवा मिळाल्याने रुग्णांना दिलासा.. – ना. गिरीश महाजन

द स्पाईन फाउंडेशनमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 9, 2025
in आरोग्य
0
मुंबईच्या डॉक्टरांची सेवा मिळाल्याने रुग्णांना दिलासा.. – ना. गिरीश महाजन

जळगाव, (प्रतिनिधी) : पाठीचा कणा हा मानवी शरीराचा सर्वात मजबूत भाग आहे. जो संपूर्ण शरीराचे वजन आणि आपल्या कामाचा भार संतुलित करतो. आयुष्यभर त्याला सतत खूप झीज सहन करावी लागते, अशावेळी मणक्यांचे दुखणे व विविध आजार जडतात. अशांना आपल्या सरकारी रुग्णालयात सेवा उपलब्ध आहे. तर जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मुंबईच्या नामांकित डॉक्टरांची सेवा जळगावातच उपलब्ध झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये शनिवारी दि. ८ फेब्रुवारी रोजी ‘मणक्याचे आजार : निदान व उपचार’ याविषयी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. मणक्याचे आजार या संदर्भामध्ये मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशनच्या टीमकडून जळगावच्या रुग्णालयात सेवा देण्यात येत आहे. ज्या रुग्णांना कमरेचे दुखणे, सायटिका, स्पॉंडीलाइटिस, स्लिप डिस्क, कमरेच्या वेदना, पायाला सारख्या मुंग्या येणे, पायाची ताकद कमी असणे असे मणक्याचे विविध आजार असतील तर त्यांची मागील महिन्यात तपासणी करण्यात आली होती. त्यातील गरजू रुग्णांवर डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वात ५ रुग्णांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.

दुपारी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधून नातेवाईकांकडून माहिती घेतली. यावेळी डॉ. शेखर भोजराज, प्रभारी अधिष्ठाता डॉ. रमेश वासनिक, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी, सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्र अग्रवाल, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, अधिसेविका जयश्री जोगी आदी उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन ना. गिरीश महाजन यांचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वासनिक यांनी स्वागत केले. शिबीर यशस्वीतेसाठी अस्थिव्यंगोपचार विभाग, शस्त्रक्रियागृह विभागाचे परिचारिका, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.


 

Next Post
कंटेनरने वृद्ध दुचाकीस्वाराला दिली धडक ; धडकेत वृद्धाचा मृत्यू

चिंचोली बस स्टॉपवर महिलेला कारची धडक ; जळगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add