• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 7, 2025
in शैक्षणिक
0
जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी जिल्हाभरात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात ७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे आदेशावरून कॉपीमुक्त अभियानासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सह प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीला उपस्थित मुख्याध्यापक यांना सूचना देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या सूचनांची काटेखोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. दहावी व बारावीच्या परीक्षा भयमुक्त व आनंददायी वातावरणात होतील याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या. परीक्षा दरम्यान ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहतील याबाबत काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारांना सह आरोपी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले.

परीक्षा केंद्राच्या आतील जबाबदारी हे केंद्र संचालकांचे असेल तर बाहेर होणारे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी पोलीस दलाची असेल याबाबत देखील सूचित करण्यात आले. परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी, सर्व केंद्र संचालक विद्यार्थी व पर्यवेक्षक यांना ओळखपत्र सक्तीचे करावे परीक्षेदरम्यान नियमांची उल्लंघन करणे तसेच गैरप्रकार करणे या बाबी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी सर्वांनी परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडण्यास पोलीस दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी उपस्थित मुख्याध्यापक व केंद्र संचालकांना संबंधित करताना सर्व केंद्र संचालकांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची गंभीरता लक्षात घेऊन या कामकाजात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्व केंद्र संचालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी पूर्वतयारी करून परीक्षा केंद्राचा अहवाल सादर करावा भरारी पथक स्वतंत्रपणे कार्यान्वित करावे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ५७४८७, व बारावीच्या परीक्षेसाठी ४७६६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदरील परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ दरम्यान होणार असून दहावीसाठी १४५ तर १२ वी करिता ८१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.


 

Next Post
साहित्याला शिक्षणाची जोड दिल्यास उत्तम रचनाकार तयार होतील.. – माजी कुलगुरू डॉ. चटपल्ली

साहित्याला शिक्षणाची जोड दिल्यास उत्तम रचनाकार तयार होतील.. - माजी कुलगुरू डॉ. चटपल्ली

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group