• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले.. – यु. व्ही. राव

अनुभूती रेसिडेंशीयल स्कूमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनास सुरूवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 7, 2025
in शैक्षणिक
0
देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले.. – यु. व्ही. राव

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे. विज्ञान हे निसर्गाची देणगी तर तंत्रज्ञान मनुष्यनिर्मित आहे. संशोधनातून शास्त्र तर आविष्कारांतून टेक्नॉलॉजीचे महत्त्व समजण्यासाठी ‘विज्ञानानुभूती विज्ञान प्रदर्शन’ मोलाचे ठरते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधून मनुष्य जीवनात शाश्वता कशी आणता येईल, याबाबत विचार केला पाहिजे ; असे मनोगत यु. व्ही. राव यांनी व्यक्त केले.’

अनुभूती रेसिडेंशीयल स्कूलमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, डॉ. भावना जैन व्यासपीठावर होते. स्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता.

मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शाश्वता यासह पाणी, विज, शेती अशा विविध विषयांना धरून वेगवेगळे असे ५० च्यावर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: साकारून सादर केले आहे. त्यात न्युटनचा साधा नियम यापासून तर रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रोमॅकनिकल अशा विषयांच्या प्रोजेक्टस् ची मांडणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली आहे. अनेक विषयांवरील अत्याधुनिक प्रकल्पांची मांडणी अनुभूती निवासी स्कूलच्या इयत्ता ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन यांनी प्रत्येक प्रोजेक्टला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आलेला प्रयोग समजावून घेतला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अन्मय जैन याने केले. शहरातील रुस्तुमजी इंटरनॅशनल स्कूल, भगिरथ हायस्कूल, सेंट टेरेसा स्कूल, आयडीएल इंग्लिश मिडीयम स्कूल, वर्ल्ड स्कूल भुसावळच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी हजेरी लावली. संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांनी अनुभूती सायन्स व टेक्नॉलॉजी मिट व अनुभूती सायन्स क्विज स्पर्धेतसुद्धा सहभाग नोंदविला.

प्रदर्शन बघण्याची संधी..
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स व आर्टिफिशीयल तंत्रज्ञानासह स्वत: साकार केलेल्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, इंजिनेअरिंग आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी वर आधारीत अत्याधुनिक विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. उद्या दि. ८ जानेवारी ला सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत शहरातील स्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी समन्वयक स्नेहल जोशी ९३०९९१८१७८ यांच्याशी संपर्क साधवा असेही आवाहन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.


Next Post
जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

ताज्या बातम्या

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती

August 28, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!

August 27, 2025
दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला
खान्देश

दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

August 27, 2025
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

August 26, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group