जळगाव, (प्रतिनिधी) : चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ व अन्य घटकांच्या विकासासाठी तसेच न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशन या कामगार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ॲड.संजय राणे यांची नियुक्ती झाली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांनी ही नियुक्ती केली असून, यासंदर्भातील त्यांचे नियुक्ती पत्रही त्यांनी ॲड.राणे यांना दिले आहे. वर्षभराच्या कालावधीकरिता असलेल्या या नियुक्तीच्या कालावधीत संघटनेच्या विस्ताराकरिता प्रयत्न करणे व संघटनेमार्फत हाती घेतलेल्या विषयांचा पाठपुरावा घेत चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ व अन्य घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी प्राधान्य देईन, असे ॲड. संजय राणे यांनी याप्रसंगी सांगितले.
ॲड. संजय राणे हे वकिली व्यवसायाच्या माध्यमातून पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासह विविध समाजपयोगी कार्यातून सातत्याने कार्यरत असतात. वकील संघटनेचे विविध पदांवर कार्य केलेले आहे. भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आहे. तसेच कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय सहभाग असणारे व्यक्तिमत्व आहे.