• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

महिला झोपली असता पुणे ते बडनेरादरम्यानची घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 3, 2025
in गुन्हे
0
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

जळगाव, (प्रतिनिधी) : पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रम आटोपल्यावर तेथून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे परतताना महिलेच्या पर्समधून रोख १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविल्याचे पाचोरा स्टेशनजवळ समजले. ही घटना ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. संध्या राठी यांच्या नातेवाईकांकडे पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे त्यांच्यासह त्यांचे पती डॉ. चंद्रकांत राठी व अन्य २ नातेवाईक गेले होते. तेथून ते दि. ३१ जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्सप्रेसने बडनेरापर्यंत येण्यास निघाले. प्रवासामध्ये संध्या राठी यांनी सोबत असलेले ३ व दुसरी २ तोळ्याच्या अशा सोन्याच्या २ चैन, डायमंड मंगळसूत्र, कानातील ८ तोळ्याचे झुमके, ५ ग्रॅमचे टॉप्स व रोख १० हजार रुपये एका बॉक्समध्ये ठेवून ते पर्समध्ये ठेवले. रात्री झोपताना त्यांनी ही पर्स बर्थवर स्वत:जवळच ठेवली.

सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानकापूर्वी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात रोकड व दागिने सापडले नाही. त्या वेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र ऐवज न सापडल्याने त्यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली. त्या वेळी तसा संदेश रेल्वे नियंत्रण कक्षातून लोहमार्ग पोलिसांना मिळताच जळगाव स्थानकावरील रेल्वे पोलिस चौकीचे पोहेकॉ सचिन भावसार यांनी जळगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस आल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
उत्तर प्रदेशातील व्यापाराला जळगावात लुटले ; तीघांना अटक

उत्तर प्रदेशातील व्यापाराला जळगावात लुटले ; तीघांना अटक

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add