• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेर शहरात रस्त्यावरील अतिक्रमणावर नगरपरिषदेची मोठी कारवाई

अनधिकृत बांधकामांवर देखील चालणार हातोडा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
जामनेर शहरात रस्त्यावरील अतिक्रमणावर नगरपरिषदेची मोठी कारवाई

किरण चौधरी, जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील जळगाव रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून उभ्या असलेल्या टपऱ्यांवर अखेर आज शनिवारी प्रशासनाने बुलडोझर चालवत कारवाई केली. नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत हे अतिक्रमण हटवण्यात आले.

मुख्याधिकारी नितीन बागुल आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई राबवण्यात आली. आज सकाळपासूनच नगरपरिषद आणि पोलिसांचे पथक जळगाव रोडवर दाखल झाले होते. अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावूनही अनेकांनी टपऱ्या हटवल्या नव्हत्या, त्यामुळे सकाळी बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या कारवाईत नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिसांचा मोठा ताफा अधिकारी उपस्थित होते.

अतिक्रमण धारकांनी या कारवाईचा विरोध केला असून, त्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले असून, त्यामुळे रस्ता मोकळा होईल आणि वाहतुकीला अडथळा कमी होईल, असे मत व्यक्त केले. नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, फक्त जळगाव रोडच नव्हे, तर शहरातील इतर मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण देखील हटवण्यात येईल. लवकरच वाकी रोड, भुसावळ रोड आणि पाचोरा रोडवरील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या आणि हातगाड्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Next Post
‘जीबीएस’ ची लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

'जीबीएस' ची लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add