जळगाव, (प्रतिनिधी) : नूतन मराठा महाविद्यालयातील संगणक विभागाकडून आज गुरुवारी संगणकावरील विविध विषयावर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
यात प्रामुख्याने ‘चॅट जीपीटी विंडो टुवर्ड्स इन ट्वेंटी फर्स्ट इरा’, आर्टिफिशल इंटेलिजन्स इन डिफेन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स इन अग्रिकल्चर, काँटम कॉम्प्युटिंग, रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन वेस्ट मॅनेजमेंट, बेनिफिट्स ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, वुमन इन कॉम्प्युटर सायन्स, अशा विविध विषयावर संगणक विभागातील ३१ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनात भाग घेतला होता.
पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी केले. यावेळी पी. जी.कॉर्डिनेटर व संगणक विभाग प्रमुख डॉ.के बी पाटील, सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर. बी .देशमुख यांनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नीलम मॅडम, दुर्गा मॅडम, अंजली गुरूचल यांनी परिश्रम घेतले.