• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुमारे ३५०० अतिक्रमित मालमत्ता धारकांना नियमानुकूलतेचा मिळणार लाभ

अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला शुक्रवारी आ.किशोर पाटील यांचे हस्ते होणार सुरुवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
सुमारे ३५०० अतिक्रमित मालमत्ता धारकांना नियमानुकूलतेचा मिळणार लाभ

पाचोरा, (प्रतिनिधी) : नगर परिषद प्रशासनाने शहरातील शासकीय जागेवरील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्या बाबतची कार्यवाही शुक्रवार पासून सुरू होत असून सकाळी १० वाजता शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून मोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात शहराचे काही टप्पे केले असून पहिल्या टप्यात शहरातील जनता वसाहत भागातील सुमारे २५० घरांची मोजणी होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमित घरे नावावर होण्याची आस लाऊन बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

शासनाचे २०११ पूर्वीची सरकारी जमिनीवरील रहिवासी क्षेत्रातील घरांचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याने अतिक्रमण धारकांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेत विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार पाटील यांनी पाचोरा व भडगाव शहर हद्दीतील सर्वच शासकीय जागेवरील अतिक्रमित धारकांची घरे नावावर लावण्याबाबत शासकीय आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने पाचोरा नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक मोजणी फी भरून मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

दरम्यान पाचोरा व भडगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील सुमारे सात हजार अतिक्रमण घरे असून टप्प्याटप्प्याने ही घरे नावावर लावण्यात येणार आहेत. मोजणी प्रक्रियेसाठी स्वतः मुख्याधिकारी मंगेश देवरे, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम व्ही तोटावार, शहर अभियंता भय्यासाहेब पाटील, पालिकेचे उपमुख्याधिकारी डी एस मराठे, दुर्गेश सोनवणे, नगररचना विभागाचे धीरज नेटके यांच्यासह भूमिअभिलेख व नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे. तरी अतिक्रमित मालमत्ता धारक बांधवानी या मोजणी प्रक्रियेत सर्व कर्मचारी वर्गाला सहकार्य करून मोजणी प्रक्रिया सुलभपणे पार पाडून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने आपण पाऊल टाकले असून पाचोरा व भडगाव शहर नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित घरे नावावर लावण्याची प्रक्रिया नगरपरिषदेने सुरू केली असून टप्प्याटप्प्याने पाचोरा व भडगाव शहरातील सरकारी जागेवरील सुमारे सात हजार मालमत्ता धारकांना त्याचा लाभ होणार आहे. यामुळे गोरगरीब जनतेला आपण लाभ मिळून देणार असल्याचे आपल्याला मनस्वी समाधान आहे.
किशोर पाटील, आमदार- पाचोरा भडगाव


 

Next Post
संगणकावरील आधारित ‘पोस्टर प्रदर्शनास’ उत्स्फूर्त प्रतिसाद

संगणकावरील आधारित 'पोस्टर प्रदर्शनास' उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group