• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश !

गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन आयोजित 'बंदे में है दम' संगीतमय मैफिलीतुन महात्मा गांधीजींना अभिवादन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश !

जळगाव , (प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्व संध्येला गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित व परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’ हा संगीतमय कार्यक्रम महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आला. महात्मा गांधी अनेक समज गैरसमज, अनेक माहीत नसलेल्या गोष्टी उलगडून सांगणारी, महात्मा गांधीजींचा शोध घेणा-या एक सुंदर संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. प्रदिप जोशी, अनिष शहा, स्वरुप लुंकड, अनिल कांकरिया, डॉ.अश्विनी देशमुख, डॉ.राधेश्याम चौधरी, सर्व सेवा समितीचे रत्नाकर पांडे, अँड.जमिल देशपांडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे शब्दगंध दिवाळी अंक देऊन सन्मानित केले गेले. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे कार्यक्रमाच्या मध्यांतरात उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या जीवनावर व कार्यावर नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. याच धोरणाच्या अंतर्गत पुण्यतिथीच्या निमित्ताने परिवर्तनच्या कलावंतांसोबत हा कार्यक्रम सादर झाला.

‘वंदे मातरम्’ने सुरवात झाली. सत्य अहिंसेची शिकवण देणारे..मानवतेचा प्रकाश दिसतो, सत्याग्रही नव नगर निघाले हि कविता सादर केले. भेटी लागे जीवा.. सावळे सुंदर रूप मनोहर..विठ्ठल नामाचा रे टाहो.. या रचना वरूण नेवे यांनी सादर केले. ‘मै तो मेरी पास में हे’ आणि ‘वैष्णव जन तो तेने’ हा गांधीजींना प्रिय अभंग सुदिप्ता सरकार यांनी सादर केला. ‘दे दे हमें आझादी साबरमती के संत… रघुपति राघव राजाराम पतीत पावन सिताराम.. ही रचना श्रध्दा कुलकर्णी यांनी सादर केली. अवघा रंग एक झाला.. अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम.. ही रचना अंजली धुमाड यांनी सादर केली.

शंभू पाटील यांनी निवेदनामध्ये महात्मा गांधीजींचे शिक्षण, आफ्रिकेतील रेल्वेमध्ये घडलेला प्रसंग, स्वालंबनासाठी गांधीजींचा सत्याग्रह, स्वराज्याची संकल्पना, विनोबा आणि गांधी यांनी दिलेला एकतेचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी याच्यातील पुणे करार यासह गांधीजींचा जीवनप्रवास उलगडून दाखविला.

या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर तर संगीत दिग्दर्शक मंजूषा भिडे, वेशभूषा प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषा लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांची होती. निर्मिती प्रमूख विनोद पाटील व वसंत गायकवाड यांची असून हर्षल पाटील सूत्रधार होते. यात गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरूण नेवे, योगेश पाटील, राहूल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे, पियूषा नेवे हे कलावंत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन च्या महिला सहकारी यांनी सुतकताई केली.


Next Post
संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे.. – आ. सुरेश भोळे

संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे.. - आ. सुरेश भोळे

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group