• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘डीआरडीए’ कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याची घरात गळफास लावून आत्महत्या

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची सुसाईड नोट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
‘डीआरडीए’ कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याची घरात गळफास लावून आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या एका ४६ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता वाघ नगर येथे घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरच्यांना मोबाईलवर सुसाईड नोट लिहून ९ जणांवर गंभीर आरोप करत पैशांची मागणी केल्याचे नमूद केले आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलिसांनी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अनिल हरी बडगुजर (वय ४६, रा.जीवन नगर ह.मु. वाघ नगर जळगाव) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. पश्चात आई लिलाबाई, वडील हरी बडगुजर, भाऊ अमित आणि दोन बहिणी असा परिवार आहे. अनिल बडगुजर हे वाघ नगर येथे एकटेच वास्तव्याला होते. जिल्हा परिषदेतील डीआरडीए विभागातील बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने ते मॅनेजर म्हणून काम करत होते.

सोमवारी दि. २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी वाघ नगर येथील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून आईवडील व भाऊ यांच्या मोबाईलवर पाठवून दिली होती. सुसाईड नोट वाचून अनिलचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर हे दोघी तातडीने वाघ नगर येथील राहत्या घरी गेले. पण तोपर्यंत अनिल बडगुजर यांनी आत्महत्या केली होती.

दरम्यान, अनिल याला गेल्या २ वर्षांपासून त्यांच्या विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. तसेच स्थानिक समितीमध्ये अनिलच्या विरोधात तक्रारही केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी ६ लाखांची मागणी केली. सुरूवातीला ६ लाख रूपये दिले परंतू त्यानंतर तक्रार मागे न घेता पुन्हा ६ लाखांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोषींना अटक करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

व्हाटसॲपवर पाठवलेल्या सूसाईड नोटमधील मजकूर..
“आई आण्णा मला माफ करा… ह्या वयात मी तुम्हाला नाही ते दुःख देत आहे. पण खरचं मी आता खूप थकलो आहे, जेंव्हापासुन मला समजायला लागले तेव्हा पासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो, आज नाही तर उद्याचा दिवस माझा राहिलं, ह्या आशेवर जगत आलो. पण संकट माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत, मला जगू वाटत होते. तुम्ही आहेत तो पर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या. पण मी किती बदनशिबी माझ्याच इच्छा मी पूर्ण करु शकलो नाही. काय पाप केले होते काय माहित ? पण मी सर्वांचे चांगले होईल ह्याचं विचाराने जगत आलो, तरी माझ्या वाट्याला असे दुःख यावे, असे संकट यावे, मी माझ्या स्वतच्या. बुध्दीवर आज पर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहीली गेली नाही, स्वतः च्या स्वार्थासाठी हरेश्र्वर भोई याने काही महिलांचा वापर केला.

मला एक वर्षापूर्वी सर्व समजले होते पण मी दुर्लक्ष करत होतों. माझ्या मरणास हरेश्र्वर भोई यास जबाबदार धरण्यात यावे. राजु लोखंडे हे फक्तं पैश्यासाठी भोईचे ऐकत होते आणि माझे काही नुकसान केले, यांना फक्तं पैसा प्रिय आहे, पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. भोईचे ऐकून शरद पाटील, संदिप खेडकर यांनी रुपाली पाटील, सुरेखा पाटील, कोमल जावळे, साधना देशमुख, सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना खोट्या तक्रारी केल्यात, PD ना काही अधिकार नसतांना त्यांनी माझे वैयक्तिक बँक खातेचे तपशील सन २०२० पासून काढले. पण त्यात त्यांना काहिच आढळून आले नाही, कारण मी आलेल्या मानधन आणि माझ्या इतर व्यवसायावर सर्व व्यवहार करत होतो, त्यामुळे माझ्या आत्महत्येस हरेश्र्वर भोई, राजु लोखंडे, कोमल जावळे, सुरेखा पाटील, रुपाली पाटील, सीमा पाटील, साधना देशमुख, शरद पाटील, संदिप खेडकर यांना दोषी ठरवण्यात यावे व जो पर्यंत यांना अटक होत नाही, तो पर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यात येऊं नये ही माझी शेवटची ईच्छा” असे नमूद केले आहे.


Next Post
ऑरगॅनिक जैविक शेतीची चळवळ गावागावात उभारणार

ऑरगॅनिक जैविक शेतीची चळवळ गावागावात उभारणार

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group