• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवैध वृक्षतोड प्रकरणात वनविभागाची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 27, 2025
in जळगाव जिल्हा
0
अवैध वृक्षतोड प्रकरणात वनविभागाची कारवाई

जळगाव, (जिमाका) : रावेर ते सावदा रस्त्यावर गस्त करीत असताना अवैध वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. २६ जानेवारी रोजी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या एमएच ०४ एफ जे ३२४८ या क्रमांकाच्या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यात सागवान पलंगाचे चार नग व एक सोपासेट मिळून आले.

या माला विषयी २७ वर्षीय वाहन चालक गणेश भीमराव खैरनार यास पास परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. सागवान पलंग व सोफा मालाचे मोजमाप घेतले असता ०.५२४ घ.मी एवढा असून या मुद्देमालाचा बाजार भाव अंदाजे किंमत ६४५०० रुपये असून ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहतूक गाडीची अंदाजे किंमत १२६००० रू. असून एकूण रक्कम= १९०५०० एवढी आहे.

या वाहनाच्या पुढील चौकशीसाठी हे वाहन आगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. ही कारवाई ही वनसंरक्षक धुळे(प्रा.) वनवृत्त धुळ्याच्या नीनू सोमराज, उप वनसंरक्षक जमीर शेख, व विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे आर .आर.सदगीर तसेच चोपडा येथील सहायक वन संरक्षक प्रथमेश हळपे, सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई ही रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय ना.बावणे , रावेरचे वनपाल रवींद्र सी.सोनवणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक जुनोना जगदीश जगदाळे यांनी केली.

Next Post
बहिणाबाई महोत्सवात बचत गटांनी केली अडीच कोटींची उलाढाल

बहिणाबाई महोत्सवात बचत गटांनी केली अडीच कोटींची उलाढाल

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group