• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तारेवरून पतंग काढताना विजेचा धक्का ; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

धरणगाव तालुक्यातील पाळधीची घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
तारेवरून पतंग काढताना विजेचा धक्का ; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : मित्रांसोबत पतंग खेळत असताना विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करताना एका १५ वर्षीय मुलाचा विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.२५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

लोकेश सोपान पाटील (वय १५, रा. बोरखेडा ह.मु.पाळधी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, लहान भाऊ, काका, काकू यांच्यासह राहत होता. इम्पेरियल स्कूल येथे इयत्ता नववीचे तो शिक्षण घेत होता. पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत होता.

काही वेळाने पतंग विद्युत तारांमध्ये अडकल्यामुळे त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर तो गेला. तेथे विद्युत तारांमध्ये अडकलेली पतंग खेचताना विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लोकेश पाटील याला हलवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मनमिळावू स्वभावाचा व हसत खेळत असणारा लोकेश काही क्षणात जग सोडून गेला हे पाहून अनेकांना रुग्णालयात अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे बोरखेडा व पाळधी गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

Next Post
बहिणाबाई महोत्सवात रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

बहिणाबाई महोत्सवात रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group