जळगाव, (प्रतिनिधी) : जळगावकर नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असलेल्या बहिणाबाई महोत्सवास गुरुवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पोलीस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी उत्सवाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली. दरम्यान विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी उद्योगपती रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील, शैलेश मोरखडे, मनोहर पाटील, प्रशांत कोठारी, कुशल गांधी, सपन झुनझुनवाला, सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे, बाळासाहेब सुर्यवंशी, शैला चौधरी, सचिन महाजन, मोहित पाटील, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, कृष्णा चव्हाण, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, विक्रांत चौधरी, मंगेश पाटील यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली. स्थानिक कलाकारांना कलांचे सादरीकरण केले. दरम्यान विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह खान्देशातील विविध खाद्यपदार्थांची चव जळगावकर नागरिकांना चाखता येणार आहे. दरम्यान महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आज दि.२४ शुक्रवारी सायंकाळी ‘ चला हवा करुया’ विनोदाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता अभिनेत्री श्रेया बुबडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा ‘चला हवा करुया’ या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
VIDEO