जळगाव, (प्रतिनिधी) : बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव शहर अंतर्गत तांबापुरा बीट व मेहरूण येथील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ‘आरंभ’ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेहरूण मधील साईबाबा मंदिर येथे कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान अर्चना प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नर्गिस तडवी , रत्ना चौधरी, मालती तावडे, लता सपकाळे, सरिता बारी, मनीषा वाणी, आशा मोरे, माधुरी चौधरी, सुनंदा पाटील, दिपाली चौधरी, स्वाती परदेशी, मेघा काळे, ज्योती महाजन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी विविध खेळ खेळून पालकांनी सहभाग नोंदवला होता. यात मायेचा घास, भविष्याचे झाड, मुखवटे, झुंबरे, विविध वाद्य, पाण्याचे खेळणे, संवेदनशील पालकत्व, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, स्पर्श ज्ञान, बाहुलीघर, वजन उंची, गोष्ट, कापडीबॉल, मनोरे, संवेदनशील स्टाॅल यासह मेंदूचे जाळे खेळात पालकांनी सहभाग घेतला होता.
प्रर्यवेक्षिका जे.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाने ‘मेंदूचे जाळे’ खेळ बनवण्यात आला होता. बालकांचा विकास संदर्भात पालकांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांचे सहकार्य लाभले. मेळाव्यासाठी मेहरूण परिसरातील शाळेचे विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.