जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील वडगाव बुद्रुक जवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातामधील १२ जण मयत झाले असून यापैकी ११ जणांची ओळख पटली आहे. पिता पुत्रांचा देखील समावेश आहे. तर जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान गुरुवारी दि.२३ जानेवारी रोजी सकाळी मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला.
▪️मयत व्यक्तींची नावे..
मैसारा नंदराम विश्वकर्मा (वय ३० ते ४०), लच्छी राम पासी (वय अंदाजे ४०), कमला नवीन भंडारी (वय ४२), राधेश्याम राम अग्नूरद (अंदाजे वय ४०), हिनू नंदराम विश्वकर्मा (वय ९ वर्ष) नंदराम पद्म विश्वकर्मा (अंदाजे वय ३५ ते ४०), जवकला भट्टू जयगडी (अंदाजे वय ५५ ते ६०, सर्व रा. नेपाळ) बाबू खान मोहम्मद शफीखान (वय २७), इमताज अली (वय ३४), शिवकुमार पृथ्वीराज चव्हाण (वय ४०), नसिरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दिकी (वय वर्ष १८, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांच्यासह एका अनोळखी ३५ ते ४० वर्षीय पुरुषाची ओळख पटलेली नाही.
▪️जखमींची नावे..
कमला विक्रम विश्वकर्मा (वय ३५), राकेश जयगडी (वय १३), सुशील विक्रम विश्वकर्मा (वय ८ वर्ष), करिष्मा विक्रम विश्वकर्मा (५ वर्ष), पियुष मोहन जयगडी (वय १९ वर्ष) रंगीलाल पासी (वय ३२ वर्ष), रघुवीर चंदेरी तेली (वय ३५ वर्ष), शौकत अली तेली (वय ४५), नूर मोहम्मद तेली (वय ३०), इमरान अली सिद्दिकी (वय २५), रहमान अली सिद्दिकी (वय १५), मोहम्मद समीर सिद्दिकी (वय ३२), रिजवान सिद्दिकी (वय १५), रामरंग पासी (वय २३) असे किरकोळ जखमी रुग्णांचे नाव आहे. या सर्वांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.