• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महावितरणच्या तपासणीत ११९ मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे उघडकीस

चाळीसगांवात धडक कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
महावितरणच्या तपासणीत ११९ मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे उघडकीस

जळगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगांव विभागांतर्गत दि.१७ जानेवारी रोजी कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, जळगावचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, चाळीसगांव विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन घुमरे व अति.कार्यकारी अभियंता रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या चाळीसगांव विभागाच्या पथकाने शुक्रवारी चाळीसगांवात दिवसभर वीज ग्राहकांच्या घरांची मीटर तपासणी केली. यावेळी ११९ वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यानंतर त्यांचे मीटर जप्त करण्यात आली असून महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई सुरु आहे.

पथकाने चाळीसगांव शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहकांच्या घरांची मीटर तपासणी केली. यात सुमारे ७९९ वीजमीटरची तपासणी केली. यावेळी ११९ ग्राहकांच्या मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले . यामुळे मीटरची गती कमी होऊन, ग्राहकांना वीज बिल कमी येते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हे मीटर जप्त केले असून, त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरू केली आहे. दंड नाही भरला तर गुन्हा दाखल केला जाणार आहे. चाळीसगांवात आता महावितरणतर्फे ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.

त्यामुळे ज्या वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केला असेल, त्यांनी स्वतः हून कंपनीकडे ती वीज मीटर जमा करावे, असे आवाहन चाळीसगांव विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी केले आहे.सदर मोहिमेमध्ये जळगाव मंडळामधील विभागीय स्तरावरील पथकांनी सहभाग घेतला तसेच उपविभागीय अभियंता रुपेश आळतेकर, योगेश पांडे, जयेश सूर्यवंशी, प्रवीण विधाते व त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनीही वीजचोरी मोहीममध्ये सहभाग घेतला.

Next Post
शेकोटीत पडल्याने जखमी बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू !

शेकोटीत पडल्याने जखमी बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू !

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group