जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण येथील साईबाबा मंदिराचा १८ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मंदिर व्यवस्थापना तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि. २३ ते २५ जानेवारी रोजी दररोज रात्री ८ ते ११ यावेळेत महाराष्ट्र साई सेवा परिवाराचे अध्यक्ष साई कथाकार साई गोपाल देशमुख यांच्या सुमधुर वाणीतून “दरबार मेरे साई का” या श्री साईबाबा यांच्या जिवन चरित्रावरील “साईकथेचे” आयोजन करण्यात आले आहे.
तसेच २५ जानेवारी रोजी दुपारी ११ ते २ यावेळेत साईप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे सर्व साई भक्तांनी सर्व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.