• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केटरिंग व्यावसायिकांसाठी ‘फॉस्टेक’ प्रशिक्षण ; आ. भोळे यांनी दिली भेट

व्यवसायात सातत्याने अपडेट राहा,उत्कृष्ट अन्नसेवा कायम ठेवा.. - आ. राजूमामा भोळे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
केटरिंग व्यावसायिकांसाठी ‘फॉस्टेक’ प्रशिक्षण ; आ. भोळे यांनी दिली भेट

जळगाव, (प्रतिनिधी) : आपल्या व्यवसायात टापटीपपणा ठेवा. भोजन उत्कृष्ट पद्धतीने तयार करून किचनमध्ये कायम स्वच्छता ठेवा. चांगल्या बाबींवर भर देऊन व्यवसायात सातत्याने अपडेट राहा, उत्कृष्ट अन्नसेवेतून चांगली लोकप्रियता घडून येते असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

खान्देश केटरिंग असोसिएशन, जळगांव व अन्न व औपथ प्रशासन विभाग जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील केटरिंग सेवा पुरविणारे सर्व अन्न व्यावसायिक यांचेसाठी गुरूवारी दि.०९ जानेवारी रोजी केमिस्ट भवन येथे सकाळी ११.०० वाजता फॉस्टेक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

दरम्यान उदघाटनावेळी मंचावर अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, जीएम फाउंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार, असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव रतन सारस्वत, सहसचिव दिनेश टाटिया, खजिनदार राजेंद्र वैष्णव उपस्थित होते.

सुरुवातीला सचिव रतन सारस्वत यांनी प्रस्तावनेतून असोसिएशन व कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी मनोगतातून अन्न व औषध मानकाबाबत माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी जिल्हाभरातून १२० केटरिंग असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

यानंतर बोलताना आ. भोळे म्हणाले की, अन्न व्यावसायिकांनी किचनमध्ये काम करताना स्वच्छतेसाठी काळजी घ्यावी. उरलेल्या अन्नाची नासाडी टाळण्यासाठी सामाजिक संस्थांशी स्वतःला जोडून घ्या. म्हणजे गरजूंना उरलेले अन्न देऊन परोपकार साधता येईल, असे सांगून केटरिंग कामासाठी बालकामगार ठेऊ नका, १८ वर्षांवरील कामगार पहा. कामगारांप्रती कायम आपुलकी ठेवा, असेही सांगितले.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने नागरिकांना सुरक्षित अन्न आणि निरोगी आहाराची उपलब्धता, वापर सुनिश्चीत करून भास्ताच्या अन्न सुरक्षा आणि पोषण परिवर्तन घडवुन आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला. दिवसभर प्रशिक्षणात केटरिंग व्यवसायातील परवान्याबाबत सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी माहिती दिली. तर फास्टॅक विषयी पी-टेक सोल्युशनच्या वृषाली दुबे यांनी सविस्तर सांगितले. खाद्य उद्योगात कुशल/प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता वाढवणे, जबाबदार खाद्य व्यवसायांद्वारे कायदा, नियम आणि नियमांचे स्वयं-अनुपालन करण्यासाठी सुधारित वातावरण तयार करणे, वर्तणुकीत बदल घडवून आणणे आणि देशात अन्न सुरक्षेची संस्कृती रुजवणे याविषयी माहिती सांगण्यात आली.

खराब तेलापासून बनणार ‘बायोडिझेल’..
केटरिंग व्यवसायात अनेकदा तेलापासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यानंतर उरलेले तेल अखाद्य म्हणून अनेकवेळा टाकून देण्याची वेळ येते. याऐवजी हे खराब तेल विकत घेऊन त्याचा बायोडिझेल बनविण्यासाठी पुनर्वापर करण्यात येईल, अशी माहिती ‘रुका’प्रकल्पाचे तसेच हरिओम सर्व्हिसेसचे महेश बजाज यांनी उपस्थित व्यावसायिकांना माहिती देऊन सांगितली.


 

Next Post
पूर्व वैमानस्यातून भुसावळात गोळीबार ; चहापीतांना दुकानात खून

पूर्व वैमानस्यातून भुसावळात गोळीबार ; चहापीतांना दुकानात खून

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group