जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तन निर्मित ‘नली’ एकलनाट्याची निवड मुंबई येथे होणाऱ्या नाट्य महोत्सवात झाली आहे. मंगळवारी ७ जानेवारी २०२५ रोजी यशवंत नाट्य मंदिर माहीम येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबई, पुणे, जळगाव,अहिल्यानगर आणि गोवा येथील आठ नाटके सादर होणार आहेत.
परिवर्तन निर्मित नली चे लेखन साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांचे असून नाट्यरूपांतरण शंभू पाटील यांनी केले आहे. दिग्दर्शन योगेश पाटील यांचे तर पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी प्रकाश योजना राहुल निंबाळकर यांचे असून निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर आणि मंजुषा भिडे हे आहेत आणि सादरीकरण हर्षल पाटील यांचे आहे.
एकलनाट्य महोत्सवाचे आयोजन स्वामीराज प्रकाशन यांच्यावतीने व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने करण्यात आलेले आहे. नाट्यमहोत्सवात नली एकल नाट्याचा ९८ प्रयोग सादर होणार आहे. ‘नली’ ची निवड ही खान्देशच्या रंगभूमीचा सन्मान आहे ,अशी प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली आहे.