• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालगंधर्व संगीत महोत्सवात कथक नृत्यासह शास्त्रीय गायनाने रसिकांची मने जिंकली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
बालगंधर्व संगीत महोत्सवात कथक नृत्यासह शास्त्रीय गायनाने रसिकांची मने जिंकली

जळगाव, (प्रतिनिधी) : पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी शिंजीनी कुलकर्णी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंताने देश विदेशात आपल्या कलेतुन भुरळ घातली. तिच लय आज कथक नृत्यविष्कारातुन जळगावकरांनी अनुभूवली. अनिरुद्ध आयठल याने शास्त्रीय व उपशात्रीय गायनातुन तरणा ‘तोम ता देरेना’ सादर करून श्रोत्यांच्या हृदयात कायमची जागा कोरली.

‘ध्यास निरंतर स्वर साधनेचा’ या थिमवर असलेल्या यंदाचा बालगंधर्व संगीत महोत्सवास दुसरा दिवसाची सुरवात अनिरुद्ध आयठल याच्या शास्त्रीय व उपशात्रीय गायनाने झाली. सुरवात राग मारू बिहाग मधील विलंबित एक तालात निबध्द बडा ख्याल, ‘रसिया हुना जावो ‘ या ख्यालाने झाली. द्रृत बंदिश तिन तालात निबध्द होती व बोल होते ‘मन मे रहो’ यानंतर अनिरुद्ध ने रूपक तालातील मध्य लयीत राग जोग सादर केला. बोल होते ‘सुगरा कल निया’ त्यानंतर तराणा तोम ता देरेना सादर करून रसिकांची वाह वाह मिळवली‌ राग अडाणातील आडा चौताळात निबध्द त्रिवट सादर केली. त्यानंतर शुरा मी वंदिले हे नाट्य पद व रंगगीत सादर केले. अभंग पद्मनाथा नारायणा सादर करून भक्तीमय निर्माण केले. त्याला तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनीवर अभिषेक सिनकर, तंबोरावर वरूण नेवे, भुषण खैरनार यांनी साथ संगत केली.

शिंजीनी कुलकर्णी हिने कथक नृत्याच्या सादरीकरणास शिव वंदनेने केली. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी लिहलेली व संगीतबध्द केलेली निरतक शंकर पार्वती संग सादर केले. विलंबित तिन ताल मध्ये 13 मात्रांच्या जद तालातील अनवट कथक मधील ताल सादर केला. कथक मधील क्रमानुसार थाट-आमद-तुकडे सादर केले. सादरीकरणाच्या शेवटी पद्मविभूषण बिरजू महाराज यांनी लिहलेली बिहारी को बस कर पाओ सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कुलकर्णी हिला विवेक मिश्रा (तबला व पढंत) सोमनाथ मिश्रा (संवादिनी व गायन) प्राजक्ता गुर्जर (सतार) यांनी संगत दिली.

दीपप्रज्वलन व कलावंताच्या स्वागतावेळी माजी आमदार मधु जैन, रेकी मास्टर शिवस्वरोदर शास्र पारंगत ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञ प्रमोद कुलकर्णी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे डॉ.अनिल पाटील यांची उपस्थिती होती. स्व.चांदोरकर प्रतिष्ठानचे शरदचंद्र छापेकर, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे, नूपूर खटावकर व पदाधिकारी यांनी मान्यवरांसह मंचावरील कलावंतांचे स्वागत केले. निवेदन जुई भागवत यांनी केले.

Next Post
सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन

सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group