जळगाव, (जिमाका) : महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ दि. ०५ जानेवारी, २०२५ रोजी घेण्यात येणार होती. मात्र ही परिक्षा आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकानुसार दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. ०५ जानेवारी रोजी घेण्यात येणारी परिक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार जळगाव मुख्यालयातील सर्व परीक्षा उपकेंद्रावर दि. ०२ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर परीक्षेकरीता जळगाव मुख्यालयातील नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी तसेच सदरहू परीक्षा उपकेंद्रातील कर्मचारी यांनी परिक्षेसंदर्भात सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जळगावच्या तहसिलदार डॉ. ज्योती गुंजाळ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.