किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओझर बु. येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमीत्ताने महाआरती, महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या भक्ती भावाने कार्यक्रमात सहभाग घेतला.
ओझर बु. गावा मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळे जवळ भक्तीभावाने संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. त्याचबरोबर यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी माजी पं.स.सदस्य रमण चौधरी, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चौधरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. संताजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण ओझर बुद्रुक गाव दुमदुमून गेले होते.
त्यावेळी नथू चौधरी, अजय चौधरी, संजय चौधरी, विक्रम चौधरी, विठ्ठल चौधरी, गणेश चौधरी, किरण चौधरी, स्वप्निल चौधरी, हर्षल चौधरी, श्रीकांत चौधरी, अमोल चौधरी, योगेश चौधरी, हरीश चौधरी आदींसह समाज बांधव उपस्थित होते.