किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळासखेडे बु. येथील मुळ रहिवाशी अक्षरा वराडे हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे नुकत्याच पार पडलेल्या १४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत यश मिळवले आहे.
ग्रुप ३ मधील वयोगट १३ ते १५ वर्षाच्या मुलींमध्ये ३ कि.मी.सागरात पोहण्याच्या स्पर्धेत अक्षरा हिने सातवा क्रमांक पटकावला आहे. ती सध्या जळगावातील ओरियन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकत आहे. अक्षराला एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलुरकर व प्रशिक्षक वैभव सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
वडील योगेश वराडे त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचे अक्षरा हिने सांगितले. अक्षरा ही जामनेर तालुक्यातील पळासखेडे बु. येथील मुळ रहिवाशी असून, अक्षराने अनेक स्थरावर आपल्या जलतरणचां ठसा उमटवला आहे व जामनेर तालुक्याचं नाव मोठं केलं आहे.