• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी.. – अजित जैन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 24, 2024
in कृषी
0
नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी भेट द्यावी.. – अजित जैन

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त १४ डिसेंबर २०२४ ते १४ जानेवारी २०२५ या काळात जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास पन्नास प्रकारची पीके उभी करण्यात आली आहेत. ही पीके पाहण्यासाठी देश व राज्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून या कृषी महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी केले आहे.

अजित जैन पुढे म्हणाले की, जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) व हवामान बदल (क्लायमेंट चेंज) या दोन समस्यांचा शेतकऱ्यांना आता वारंवार सामना करावा लागतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसानही होत आहे. हे नुकसान कसे टाळावे आणि त्यासाठी उत्पादन पद्धती बदल करून कोणती नवीन तंत्रे वापरावीत या संबंधीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे म्हणून आधुनिक पद्धतीने पीके उभी केली आहेत. ती शेतकऱ्यांना समक्ष पाहता येतील. ‘बघितले की विश्वास बसतो’ असे म्हणतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात उभी असलेली ही पीके स्वत: पाहणे गरजेचे आहे.

कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कांद्यामध्ये केळी बागेची उभारणी, गादीवाफ्यावर आधाराने व बिन आधाराची कागोमी जातीच्या टोमॅटोची लागवड, मिरची, पपई यांची सीडलिंग लावून केलेली लागवड, हळदीचे पीक, ठिबकवर गहू, भात यांची लागवड, उसाला वरून मॉड्यूलर स्प्रिंकलरद्वारे पाणी, सौर पंपांच्या सहाय्याने पिकांना सिंचन, पॉलिहाऊस मधील बंदिस्त व नियंत्रित वातावरणात केळी, आंबा, संत्री, मोसंबी या फळझाडांची लागवड, सघन व अतिसघन पद्धतीने उभ्या केलेल्या फळबागा (उदा सीताफळ, पेरू, चिकू, आंबा, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज वगैरे) या बरोबरच गादीवाफा, मल्चिंग, डबल लॅटरल, फर्टिगेशन ही सर्व तंत्रे शेतकऱ्यांना येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कृषी महोत्सवासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नसून शेतकऱ्यांना ते मोफत पाहता येईल. तसेच टिश्यूकल्चर व अन्य तंत्राद्वारे तयार केलेली उत्कृष्ट दर्जेदार व रोगमुक्त रोपेही शेतकऱ्यांना पाहता येतील असेही अजित जैन यांनी सांगितले.

Next Post
एअरगन बाळगत दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

एअरगन बाळगत दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group