किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मधील मंत्री मंडळातील खाते वाटप झाल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जामनेर शहरात दाखल झाले यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. दरम्यान पुष्प वृष्टी करत ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाते वाटप जाहीर झाले असून जिल्ह्यात ना. गिरीश महाजन यांना जलसंपदा तर ना. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता आणि वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी ना. संजय सावकारे यांना मिळाली आहे. दरम्यान तीनही मंत्री आपापल्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ना. गिरीश महाजन यांचे जामनेरात शहरात आगमन झाल्यानंतर आयटीआय रोड येथून ना. महाजन यांची वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात स्वागत मिरवणूक काढण्यात आली. सोबत फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मिरवणूकी दरम्यान मंत्री महाजन यांनी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी शहरासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.