समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य.. -आ.राजूमामा भोळे
जळगाव, (प्रतिनिधी) : आपल्या समाजाचा अभिमान बाळगून समाजाशी असलेली नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य आहे. कुठल्याही क्षेत्रात मोठ्या पदावर गेल्यावर समाजाचे कार्य करत राहावे, असे आवाहन आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी केले. शहरातील अल्पबचत भवनात रविवारी २२ रोजी राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून आ.भोळे बोलत होते. मेळाव्यात १५० हुन अधिक युवक-युवतींनी परिचय करून दिला. यावेळी १० विवाह जुळण्यात आले.
राज्यातील धनगर समाजातील सर्व शाखीय विवाह जोडणाऱ्या “मांगल्य” वधु वर सुचक केंद्र जळगाव आणि जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने २९ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार भोळे यांनी समाजाविषयी राज्य शासनाने राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच समाज वधु-वर परिचय मेळाव्यास उपस्थित युवक-युवतींना शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती..
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे आ. राजूमामा तथा सुरेश भोळे, दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, वैशाली ढेरे, मल्हार सेनेचे सरसेनापती सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे, माजी नगरसेवक चंद्रशेखर पाटील, केशव पातोंड, डॉ.सिद्धांत घोलप, मल्हार सेनेचे सरचिटणीस संदीप तेले, रमेश सुलताने, अरुण ठाकरे, रामचंद्र चऱ्हाटे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक रेखा न्हाळदे यांनी तर सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे आणि गणेश बागुल यांनी केले. आभार धर्मा सोनवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी धर्मा सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे, डी.बी.पांढरे, अरुण ठाकरे, महेंद्र सोनवणे, डिगंबर सोनवणे, प्रवीण पवार, प्रमोद चऱ्हाटे, कुणाल सुलताने, उमेश सूर्यवंशी, प्रमोद सोनवणे, संदिप मनोरे आदींनी परिश्रम घेतले.