• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र..  – एस. एस. म्हस्के

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 22, 2024
in कृषी
0
जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र..  – एस. एस. म्हस्के

जळगाव, (प्रतिनिधी) : भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे साधन म्हणजे शेती उद्योगाकडे बघितले जाते. अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करीत आहे त्याला नैसर्गिक फटका बसला की तो नैराश्याच्या गर्तेत अडकला जातो ही वस्तुस्थिती समाजात आहे. याउलट परिस्थिती जैन इरिगेशनच्या जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि चांगले मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही. हायटेक स्मार्ट शेतीचा मूलमंत्र देणाऱ्या या जैन हिल्स वरील कृषिमहोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने भेट दिली पाहिजे असे आवाहन जळगाव उपविभागाचे डाकघर अधिक्षक एस. एस. म्हस्के यांनी केले आहे.

जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. १४ जानेवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव आहे. सौर कृषी पंप, वेगवेगळ्या वातावरणाला अनुसरुन पाईप, ठिबक तंत्रज्ञान, पाणी निचरा करण्याची पद्धती, फळलागवड पद्धत जी कमी जागेत जास्त उत्पन्न देणारी ठरणारी अशी अतिसघन आंबा लागवड पद्धत, त्यासोबतच हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफळ, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापरातून शाश्वत निर्यातक्षम उत्पादन कसे घेता येते हे प्रयोग येथे पाहता येत आहे. हे फक्त प्रयोग नसून ते शेतकऱ्यांच्यासह भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. या कृषिमहोत्सवात डाक विभागाचासुद्धा स्टॉल आहे त्यालाही भेट देण्याचे आवाहन एस. एस. म्हस्के यांनी केले आहे.

Next Post
सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group