किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील गारखेडा येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश माणिकराव पाटील यांची कन्या प्रिया पाटील यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. आज त्या अधिकृतपणे पीएसआय पदावर रुजू झाल्या आहेत.
प्रिया यांनी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली गुणवत्ता सिद्ध केली असून स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांच्या यशामुळे कुटुंबीयांसह गारखेडा गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
प्रकाश माणिकराव पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रियाच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे यश शक्य झाले आहे. प्रियाचा हा प्रवास ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. प्रिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून गावात आनंदाचे वातावरण आहे.