किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : शहरातील शिक्षक दाम्पत्याच्या घरात भरदिवसा चोरी करत रोख रक्कमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात चोरट्यांनी सीसीटीव्ही तोडून ही धाडसी चोरी केली आहे.
शहरातील बेस्ट बाजार, नवकार प्लाझा येथील शिक्षक दांपत्याच्या घरात दि.१९ रोजी गुरूवारी साधारणतः सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्षक किरण श्रीराम महाजन हे आपल्या पत्नीसह शिक्षक असल्याने ते सकाळी साडे सहा वाजता आपल्या पत्नीसह घराला कुलूप लावून शाळेत गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोंडून घरातून वीस हजार रुपये रोख व ५० ग्रॅम सोने घेऊन चोरटे पसार झाले आहे.
विशेष म्हणजे चोरट्यांनी बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही तोडल्यानंतर ही धाडसी चोरी केल्याचे शिक्षक किरण महाजन यांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, सचिन महाजन, दिपक जाधव, राहुल महाजन हे घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर फिंगरप्रिंट पथक, श्वान पथक दाखल होऊन सदर घटनेची चौकशी करत किरण महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर संशयितांचा त्यांचा शोध सुरू असलेल्याची माहीती पोलीस निरीक्षक मुरलीधर यांनी सांगितली.