जामनेर, (प्रतिनीधी) : परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व त्यानंतर झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी गुरूवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदवित तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याचा देखील यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. शाह यांनी सर्व संविधान प्रेमी आणि लोकशाहीवादी यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान या मागण्यांचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले. यावेळी राहुल इंगळे, सचिन सुरवाडे, ज्ञानेश्वर जोहरे, किशोर तायडे, ऍड. राजेश मोगरे, संगम तायडे, अक्षय निराले, साईराज इंगळे, भारत गायकवाड, प्रकाश वाघ, राहुल वाघ, मनोज तायडे, दिलीप बनसोडे, संदीप वाघ, रुपेश वाघ, राहुल वाघ, तेजू इंगळे, मंगेश म्हस्के आदींसह कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.