• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती ; अर्ज करण्याचे आवाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती ; अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) : जळगावातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह, माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव तसेच माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने वसतिगृह सहायक अधिक्षक, पहारेकरी कम एमटीएस ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. २७ डिसेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

यात वसतिगृह सहाय्यक अधिक्षक पदासाठी एक जागा असून यासाठी माजी सैनिक प्रवर्गातील हवालदार, नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरून निवृत्त झालेले JCOs अर्ज दाखल करु शकतात. मराठी व इंग्रजी टाईपिंग येत असलेल्या JCOs ला प्राधान्य देण्यात येणार आहे.

तसेच पहारेकरी कम एमटीएस पदासाठी मुलांचे वसतीगृह जळगाव, मुलींचे वसतीगृह जळगाव, माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह, जळगाव आणि माजी सैनिक बहुउद्येशिय सभागृह, रावेर येथे प्रत्येकी एक पुरुष अशा ४ जागा भरायच्या आहेत. या पदाकरिता माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार अथवा माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. या उमेदवारास २४ तास कामकाजासाठी उपलब्ध असावे लागणार आहे. सदर पद हे निवासी आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबूक, रहिवाशी दाखला, (I Card & Discharge book for Ex servicemen only) दोन फोटो व Police verification certificate आवश्यक असणार आहे. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४. या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह २७ डिसेंबर पर्यंत जळगाव येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Tags: #job
Next Post
शाळांजवळील पानटपरी चालकांवर कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई

शाळांजवळील पानटपरी चालकांवर कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group