• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आयशरच्या धडकेत तरुण जागीच ठार ; अजिंठा चौकाजवळील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
आयशरच्या धडकेत तरुण जागीच ठार ; अजिंठा चौकाजवळील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरात भरधाव आयशरने एका पायी जाणाऱ्या तरुणाला उडवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

अजय सिताराम कोळी (वय २६ रा. पिंपळे खुर्द ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या एका भरधाव आयशरने पायी जाणाऱ्या अजय कोळी याला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयताच्या खिशातील कागदपत्रामुळे त्यांची ओळख पटली आहे. नातेवाईकांनी रुग्णालयात येताच मन हेलावणारा आक्रोश केला. अजय कोळी याचे वडिलांचे नुकतेच दिनांक २ डिसेंबर रोजी मृत्यू झाल्यामुळे घरात शोकाचे वातावरण असतानाच आता पित्यापाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्यामुळे पिंपळे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: accident
Next Post
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती ; अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती ; अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group