जळगाव, (प्रतिनिधी) : भाजपच्या विधान परिषदेच्या आ. पंकजा मुंडे व आ. धनंजयजी मुंडे यांची राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. दरम्यान जळगाव शहरातील मेहरून मध्ये लाड वंजारी युवा संघटनेतर्फे समाज बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केला.
मागच्या काही वर्षांत पंकजा मुंडे यांना पक्षातून सातत्याने डावललं जात असल्याची चर्चा होती. त्यांच्या नाराजीच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचं देखील बोललं जात होतं. मात्र पंकजा मुंडे कायम पक्षासोबत राहिल्या. म्हणून त्यांच्या एक निष्ठतेचे फळ पक्षाने दिले असे लाड वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मेहरूण परिसरात सर्व समाज बांधवांनी एकमेकाला मिठाई भरवत आनंद साजरा केला. तसेच ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी केली.
यावेळी माजी महापौर सिमा भोळे, भारती सोनवणे, गायत्री राणे, अर्चना प्रशांत नाईक, राजेंद्र घुगे पाटील, लाडवंजारी समाज अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, उपाध्यक्ष विजय लाडवंजारी, देविदास इखे, अशोक लाडवंजारी, देविदास लाड, दौलत पाटील, अनिल घुगे, गजानन ढाकणे, संजय सुदाम वंजारी, महादू कारभारी सोनवणे, शरद लाड, खन्ना महाराज, रामेश्वर पाटिल, एकनाथ वाघ, शेखर लाड, राहुल सानप, योगेश घुगे, देवेंद्र नाईक, गोविंदा सांगळे, ऋषिकेश नाईक, स्वप्निल घुगे, राहुल सानप, योगेश नाईक, मंगेश नाईक, संकेत सानप, आकाश नाईक, माही बजरंग, तेजस वाघ, कल्पेश वाघ, मिलिंद आंधळे, भूषण वंजारी, ऋषिकेश नाईक, अमोल सानप, गोविंदा सांगळे, वैभव इखे, ओम नाईक, शुभम घुगे, रितेश लाडवंजारी, अभय चौधरी, गौरव घुगे, वैभव वाघ, तेजस घुगे, सिद्धू घुगे, यश चाटे सर्व समाज बांधव उपस्थित होते.