विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गुरुचरित्राचे पारायण करण्यात येत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सात दिवस आधी अष्टमीपासून दत्त जयंती विशेष प्रहर, सप्ताह सुरू होतो. यात श्रीगुरूचरित्र पारायण पठण केले जात आहे.
दरम्यान शहरातील स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंती निम्मित प्रहार साप्ताहचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. दरम्यान या सप्ताहाचा समारोप सोमवारी दि. १६ रोजी होणार आहे.
आ.किशोर पाटील यांची सभामंडपासाठी २१ लाख रुपयांच्या निधीची घोषणा..
आमदार किशोर पाटील यांनी दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भेट दिली असता यावेळी सभा मंडप भाविकांनी गच्च भरलेला होता तर काही भगिनींना सभा मंडपाच्या बाहेर उभे पाहीले. दरम्यान मंदिराच्या सेवेकर्यांची चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व लागलीच त्यांनी मंदिराच्या सभा मंडपाच्या नूतनीकरणासाठी २१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा बोलताना केली. व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन देखील करून टाकले. यावेळी उपस्थित भाविकांनी आमदार पाटील यांचे आभार मानले.