• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 14, 2024
in कृषी
0
हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात

जळगाव, (प्रतिनिधी) : शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ उपलब्ध झाली आहे. शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाधारित शेतीची कास धरली तरच चैतन्याचे व भरघोस उत्पन्नाचे मोठे संचित शेतकऱ्यांच्या हाती लागेल हे त्रिवार सत्य आहे. या महोत्सवाची आधुनिक तंत्रज्ञान आणि नवचैतन्य ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे. १४ जानेवारी २०२५ पर्यंत होणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले.
जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ‘संजीवन दिन’ निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिक्स इन वन ह्या संकल्पनेत ऊसाची शेती, कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेले क्षेत्र याचा समावेश आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्या जात आहेत. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, आले, लसूण यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता व अनुभवता येणार आहे.

कृषी महोत्सवात १२ बैलगाड्यांची संकल्पना..
आधुनिक काळात शेतीमध्ये बैल गाडी ही संकल्पना पुसट होत चालली आहे. ग्रामीण संस्कृतिचे जतन व्हावे आणि एक चांगला संदेश जावा यासाठी या महोत्सवात १२ बैल गाड्यांची संकल्पना उभारण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात यात्रा किंवा विशिष्ट तिथीला १२ गाड्या एकमेकांना बांधून एखादी व्यक्ती त्या ओढत असते. त्या बैलगाडीवर गावातील लोक बसलेले असतात. याच संकल्पनेच्या धरतीवर आधुनिक शेतीच्या तंत्राची, ठिबक सिंचन, पाईप, पाईप फिटींग, फिल्टर्स इत्यादी बाबी, तंत्रज्ञान अशी जैन इरिगेशनची उत्पादने या गाड्यांवर पहायला मिळतील. सेल्फीसाठी “जैन हायटेक एक्स्प्रेस” कृषी रेल्वेची कलाकृतीही जैन इरिगेशनच्या कला विभागातील आर्टिस्टद्वारा उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ही जैन हायटेक फार्मिंग एक्स्प्रेस कृषी क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याचं प्रतीकच आहे.

जैन हिल्स येथे या महोत्सवानिमित्त लागवड केलेले पिके त्यांचे माहिती फलके, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सज्ज आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये नव चैतन्य फुलण्यासाठी टिश्युकल्चर, सीड, सिडलींग यांचेही तंत्र एकाच छताखाली पहावयास मिळते. या महोत्सवाला भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.


Next Post
चोरी गेलेला डंपर शोधण्यात एमआयडीसी पोलिसांना यश

चोरी गेलेला डंपर शोधण्यात एमआयडीसी पोलिसांना यश

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group