• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2021
in जळगाव जिल्हा
0
कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

जळगाव, दि. 22 (जिमाका) – कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून, 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता याप्रमाणे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव टंचाई शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, संपर्क क्रमांक-0257-2217193/2223180, ई-मेल- scy.jalgaon@gmail.com असा आहे.

तक्रार निवारणासाठी समिती स्थापन
‘कोविड-19’ मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला सानुग्रह अनुदानाबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय आणि महानगरपालिका क्षेत्र अशा दोन तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती ही महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, जळगाव तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक हे राहतील.

तसेच महानगरपालिका क्षेत्राकरीताही तक्रार निवारण समिती राहील. ही समिती मनपा प्रशासकीय क्षेत्रनिहाय असून या समितीचे अध्यक्ष हे मनपा उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतील तर मनपाचे वैद्यकीय अधिकारी तथा त्यांचे प्रतिनिधी हे समितीचे सदस्य सचिव असतील. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

Next Post
शिवसेनेतर्फे शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप

शिवसेनेतर्फे शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप

ताज्या बातम्या

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add